• नवेगाव बांध जि.गोंदिया

    • Photo Grid Food & Drink
    पातोडी रस्सा, पोपटी, मटकीची उसळ, तीळा, केळाची भाजी आणि फोडणीचं वरण, मसालेभात खायचायं ना? हो हो आणि इथली फेमस आलू-वाग्यांची भाजी हे सर्व मिळू शकेल तुम्हाला नवेगाव बांध परिसरात. त्याचबरोबर नवेगाव बांधमधले मासे जे त्यांच्या उत्तम चवीसाठी प्रसिध्द आहेत. अशा ताज्या माशांची करी, फ्राय मिळेल. शिवाय मटण, चिकन करी सुद्धा मिळू शकेल. विशेष म्हणजे सर्व पदार्थ ‘खोली’ गावात किंवा परिसरात पिकलेल्या किंवा मिळणाऱ्या रसायनविरहीत गोष्टींपासून बनवले जातात. जेवणासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर आगाऊ ऑर्डर दयावी लागेल, पार्सल सुविधाही उपलब्ध आहे.
    (नवेगाव बांधच्या वनविभागाच्या गेस्ट हाऊस पासून २ कि.मी. अंतरावर असणाऱ्या ‘खोली’ या गावात गेल्या सहा वर्षापासून भाग्यलक्ष्मी महिला स्वयंसहायता बचत गट चालू आहे. तुम्हीही या जेवणाचा आस्वाद घेऊन बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देऊ शकता)
    संपर्क – दमयंता कापगते – 9422978565, मंगला सोनवणे – 7507509517, भूमिता कापगते - 9404026029